रानभाज्यांच्या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
रानभाज्यांचे आहारातील महत्त्व, पोषणमूल्ये आणि औषधी गुणधर्म नागरिकांपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने सुभेदार वाडा कट्टा आणि रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने शारदा मंदिर शाळेत रानभाज्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाला नागरिकांसह विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शहापूर तालुक्यातील आदिवासी महिलांनी प्रदर्शनात विशेष सहभाग घेत नैसर्गिकरीत्या उपलब्ध होणाऱ्या सुमारे २५ प्रकारच्या रानभाज्या मांडल्या. आघाडा, अळू, अंबाडी, गुळवेल, चाकवत, करटोली, रानमेथी, माठ, शेवगा, भारंगी, भोकर, टाकळा आदी रानभाज्यांचा यामध्ये समावेश होता.
Kalyan, Thane | Aug 27, 2026