माणगाव तालुक्यातील मौजे सणसवाडी गावच्या हद्दीत मारुती सुझुकी वॅगनार गाडीची दुभाजकाला धडक लागून अपघात झाल्याने महिलेचा मृत्यू झाला. गुरुवारी (दि.4) माधव मेहता हे त्यांचे मालकीची मारुती सुझुक वॅगनार गाडी स्वतः चालवित घेऊन जात असताना पुणे- माणगांव रोडने ताम्हीणी घाट मार्गे जात असताना मौजे सणसवाडी गावच्या हद्दीत टी. पॉईंट पुढे सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आल्यावेळी अचानक त्यांच्या कार समोर कुत्रा आल्याने त्यांनी कार बाजुला घेतली असता रोडच्या कडेला असलेल्या दुभाजकाला कारची ठोकर लागली.