हिंगणा: पतीचा खून करून अपघाताचा बनाव रचणाऱ्या पत्नीच्या प्रियकराला अटक, एमआयडीसी हद्दीतील थरार
Hingna, Nagpur | Aug 15, 2026 15 ऑगस्टला रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत सुधीर महेंद्रप्रसाद द्विवेदि यांचा मृतदेह विद्युत खांबाजवळ मृत अवस्थेत आढळला होता. मृतक सुधीरची पत्नी सौ. पुजा सुधीर द्विवेदि हिचे आशिकुमार नरेशकुमार अग्नीहोत्री याच्यासोबत प्रेमसंबंध होते, ज्यातून दोघांनी संगनमत करून खून केला.आरोपींनी मृतकास दारू पाजून, लोखंडी रॉडने कपाळावर मारले व ओढणीने नाक-तोंड दाबून जिवे मारले आणि मृतदेह फेकून अपघाताचा बनाव रचला. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी आशिकुमार यास अटक केली.