बाभूळगाव: यवतमाळ DCC बँकेच्या अध्यक्षपदासाठी महायुती-स्थानिक नेत्यांमध्ये तंग मुकाबला
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी महायुती आणि स्थानिक नेत्यांमध्ये राजकीय रस्सीखेच तीव्र झाली आहे. नुकत्याच निवडणुकीनंतर अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी वेगाने सुरू असून संघर्ष अधिक गडद होत आहे.