हिंगणा: टाकळघाट येथून वाहनांची तोडफोड करणाऱ्या ५ आरोपींना अटक
Hingna, Nagpur | Mar 27, 2026 इंदिरामातानगरातील दुचाकी, कार, ऑटोरिक्षांची तोडफोड करून पसार झालेल्या पाच आरोपींना अटक करण्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ व एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. दोन्ही पोलिसांनी संयुक्त कामगिरी करून आरोपींना अटक केली. सुमित महादेव इंगोले वय ३३, रा. इंदिरामातानगर,हे २३ मार्चला रात्री ९ वाजताच्या सुमारास घरी असताना आरोपी आकाश उर्फ बाका सतीश सहारे त्याच्या साथीदारांसह हातात शस्त्र घेऊन इंगोले यांच्या घरासमोर आला आणि शिवीगाळ करून हातात असलेले शस्त्र फिरवून जिवानिशी ठार मारण्याची धमकी दिली.