परतूर: मुख्य बाजारपेठेमध्ये झेंडूच्या फुलांना कवडीमोल भाव, झेंडू उत्पादक शेतकरी अडचणीत
Partur, Jalna | Oct 20, 2026 आज दिनांक 20 ऑक्टोबर 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास परतूर शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये झेंडूच्या फुलांना कवडीमोल भाव मिळाल्याचे पाहायला मिळाले आहे, आज महत्त्वाचा सण तो म्हणजे विजयादशमी या दिवशी प्रत्येक घराघरात झेंडूचे फुले विक्री करून घेतात मात्र यामध्ये पाच ते दहा रुपये प्रति किलोने झेंडू या उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठेमध्ये विकावा लागला आहे त्यामुळे झेंडू उत्पादक शेतकरी आज अडचणीत आल्याचे पहायला मिळाले आहे.