परतूर: शासन पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी : परतूर,मंठाचे आमदार बबनराव लोणीकर
Partur, Jalna | Oct 31, 2025 गेल्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी, पूर आणि वादळवार्यांमुळे आपल्या शेतीचे आणि पिकांचे मोठे नुकसान झाले. राज्यातील अनेक भागांप्रमाणेच आपल्या जालना जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात शेती उद्ध्वस्त झाली, पिकं नष्ट झाली आणि शेतकऱ्यांवर संकट ओढवले. या संपूर्ण परिस्थितीची तात्काळ दखल घेऊन मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीमंडळाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती परतूर मंठाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी माध्यमाना दिली