हिंगणा: भाजपा च्या संघटनात्मक बैठकीला आमदार समीर मेघे यांची उपस्थिती
Hingna, Nagpur | Aug 21, 2026 21 ऑगस्ट ला सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार विदर्भ विभागाची संघटनात्मक बैठक प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्र जी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी आगामी संघटनात्मक वाटचालीसह विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच विदर्भ विभागाच्या संघटनात्मक कार्याला नवी दिशा देण्यासाठी भाजपापदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या बैठकीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह आमदार समीर मेघे व इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते.