आपले आरोग्य, आपली जबाबदारी! KDMC चा मोफत आरोग्य तपासणी उपक्रम
छातीचा एक्स-रे ते ABHA कार्डपर्यंत सर्व सेवा मोफत; न
टीबी निर्मूलनासाठी KDMC ची जनजागृती; दत्तनगरमध्ये विशेष आरोग्य शिबिर
कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत दत्तनगर नागरी आरोग्य केंद्राच्या वतीने ‘टीबी मुक्त भारत अभियान’ आणि ‘आरोग्य अभियान’ अंतर्गत विशेष मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि क्षयरोग निर्मूलनाच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या शिबिरामध्ये नागरिकांसाठी विविध आरोग्य सुविधा पूर्णतः मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये छातीचा एक्स-रे, थुंकी तपासणी, आभा (ABHA) कार्ड नोंदणी तसेच आयुष्मान भारत योजनेबाबत मार्गदर्शन व नोंदणी यांचा समावेश आहे.
महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे नागरिकांना वेळेत आरोग्य तपासणी करून घेण्याची संधी मिळणार असून क्षयरोगाच्या लवकर निदानासही मदत होणार
Kalyan, Thane | Jun 27, 2026