आदिवासींचे अंगठे कापू देणार नाही; प्रत्येक वाडीत नाग्या कातकरी उभा राहिला पाहिजे – बाळाराम भोईर
पालघर, दि. २५ जून :"जमीन ही आपली आई आहे. आपल्या आईला विकू नका. श्रमजीवी संघटना यापुढे आदिवासींचे अंगठे कापू देणार नाही. प्रत्येक कातकरी वाडीत अन्यायाविरुद्ध लढणारा नाग्या कातकरी उभा राहिला पाहिजे," असा घणाघाती निर्धार श्रमजीवी संघटनेचे कार्याध्यक्ष बाळाराम भोईर यांनी व्यक्त केला.पालघर तालुक्यातील पोचाडे-तामसई येथे आयोजित गावभेट व सभासद नोंदणी अभियानाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
श्रमजीवी संघटनेची राज्यभर सुरू असलेली भव्य सभासद नोंदणी मोहीम सध्या वेगाने सुरू असून पालघर आणि डहाणू तालुक्यात या मोहिमेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. डहाणू तालुक्यात कार्यकर्ते आणि सभासदांनी संघर्ष करून २,१०० जन्मदाखले मिळवून देण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. या लढ्यामुळे संपूर्ण डहाणू तालुक्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून गावागावांत
Kalyan, Thane | Jun 26, 2026