उल्हासनगर सुपर स्पेशालिटी कॅशलेस रुग्णालयाला महाराष्ट्रातील पहिले ‘एनएबीएच प्रवेशस्तर मानांकन’
खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने रुग्णालयाची उभारणी
कल्याण - कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या उल्हासनगर महानगरपालिका सुपर स्पेशालिटी कॅशलेस रुग्णालयाने आरोग्यसेवेच्या क्षेत्रात आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. महाराष्ट्रातील महापालिकेच्या अखत्यारीतील रुग्णालयांमध्ये प्रथमच या रुग्णालयाला ‘एनएबीएच प्रवेशस्तर मानांकन (NABH Entry Level Certification)’ प्राप्त झाले आहे. या मानांकनामुळे रुग्णालयातील उपचारांची गुणवत्ता, रुग्ण सुरक्षितता आणि आरोग्यसेवेची उत्कृष्टता राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाली आहे.
उल्हासनगर येथील म्हारळ रोडवरील रिजेन्सी अँटिलिया परिसरात उभारण्यात आलेले हे २०० खाटांचे अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी कॅशलेस रुग्णालय खासदार डॉ. श्र�
Kalyan, Thane | Jun 26, 2026