धर्मवीर आनंद दिघेंच्या २५व्या स्मृतिदिनी शक्तिस्थळावर
युवा सेना कल्याण जिल्हा लोकसभा अध्यक्ष जितेन पाटील यांच्याकडून विनम्र अभिवादन
कल्याण : धर्मवीर आनंद दिघे यांच्या २५व्या स्मृतिदिनानिमित्त ठाण्यातील शक्तिस्थळ येथे युवा सेना कल्याण जिल्हा लोकसभा अध्यक्ष जितेन पाटील यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन केले.
यावेळी जितेन पाटील यांच्यासह युवा सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या सामाजिक कार्याला आणि सर्वसामान्य जनतेसाठी केलेल्या योगदानाला उजाळा दिला.धर्मवीर आनंद दिघे यांनी आपल्या कार्यातून सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण केलेले स्थान आजही कायम असून, त्यांच्या विचारांचा आणि समाजसेवेचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार यावेळी जितेन पाटील यांनी व्यक्त केला
Kalyan, Thane | Aug 26, 2026