कल्याण पूर्वेतील धक्कादायक घटना
महिलेचे मंगळसूत्र खेचून पळणाऱ्या चोरट्याला नागरिकांनी रंगेहात पकडले ,कोळसेवाडी पोलिसांनी चोरट्याला ठोकल्या बेड्या
कल्याण :- कल्याण पूर्वेकडील चिंचपाडा परिसरात राहणारी एक महिला काल दुपारच्या सुमारास विजयनगर येथून पायी चालत जात होती .याच दरम्यान एक इसम पाठीमागून आला आणि त्याने या महिलेला धक्का मारून तिच्या गळ्यातले मंगळसूत्र खेचून पळून जाण्याचा प्रयत्न केला .मात्र महिलेने प्रसंगावधान राखत चोर चोर असा आरडाओरड सुरू केला . आजूबाजूच्या नागरिकांनी तत्काळ या चोरट्याचा पाठलाग करत त्याला पकडले आणि गस्तीवर असलेल्या चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं .पोलिसांनी या चोरट्याच्या अंग झडती घेतली असता त्याच्याजवळ चोरलेले मंगळसूत्र आढळून आले. या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत चोरटा गणेश शिरमाने याला बेड्या ठोकल्या आहेत.
Kalyan, Thane | Jun 27, 2026