पाऊस थांबताच कबुतरांनी गाठली भातशेती
कबुतरांच्या उपद्रवाने बळीराजाची वाढली चिंता
ठाणे जिल्ह्यात भात पेरणीवर कबुतरांचे सावट
ठाणे :- मान्सून दाखल झाला असला तरी कृषी विभागाकडून अद्याप भात पेरणीबाबत स्पष्ट आवाहन करण्यात आलेले नाही. दरम्यान, दोन दिवसांच्या संततधार पावसानंतर गुरुवारी पावसाने उघडीप दिल्याने पेरणी केलेले भात बियाणे झाकून ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शहरांमधून ग्रामीण भागाकडे मोठ्या प्रमाणात कबुतरांचे थवे दाखल झाल्याने पेरलेल्या बियाण्यावर ते ताव मारत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे अंबरनाथ, कल्याण आणि ठाणे तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे.
पावसाचा जोर कमी होताच शहर परिसरातून ग्रामीण भागाकडे मोठ्या प्रमाणात कबुतरांचे थवे दाखल झाल्याचे चित्र दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी जमिनीत टाकलेले भात बियाणे झाकून ठेवण्यासाठी प्लास्टिक आच्छादनाचा वापर केला असला तरी अनेक ठि�
Kalyan, Thane | Jun 26, 2026