भाजप भटके विमुक्त मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भिवंडी लोकसभा मतदारसंघात तब्बल १० हजार वृक्षलागवड
जनतेचे प्रेम, कार्यकर्त्यांची साथ हीच खरी संपत्ती - माजी आमदार नरेंद्र पवार
कल्याण :भाजप भटके विमुक्त मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा कल्याण पश्चिमचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघातील कल्याण पश्चिम, भिवंडी, शहापूर आणि मुरबाड आदी विधानसभा मतदारसंघांमध्ये तब्बल १० हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याला आगळ्यावेगळ्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
नरेंद्र पवार यांचा वाढदिवस दरवर्षी कार्यकर्ते, नागरिक तसेच त्यांच्या समर्थकांकडून मोठ्या उत्साहात साजरा के
Kalyan, Thane | Aug 27, 2026