*नेपाळमध्ये अडकलेल्या ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी/नातेवाईकांनी जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राशी संपर्क साधावा*
*-जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांचे आवाहन*
ठाणे : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर तेथील पर्यटक व नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक माहिती संकलित करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील जे पर्यटक/नागरिक सध्या नेपाळमध्ये असून पूरस्थितीमुळे अडकले आहेत किंवा ज्यांचा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क होत नाही, त्यांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.
*माहिती देताना खालील तपशील उपलब्ध करून द्यावेत:-*
• संबंधित व्यक्तीचे संपूर्ण नाव
• मोबाईल क्रमांक
• नेपाळमधील
Kalyan, Thane | Aug 27, 2026