कल्याण-डोंबिवली मनपा शिक्षण विभागाची मुख्याध्यापकांची पहिली सभा संपन्न
विद्यार्थी सुरक्षा, गुणवत्ता आणि नवीन शैक्षणिक धोरणांवर भर
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) शिक्षण विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांच्या मुख्याध्यापकांची पहिली महत्त्वपूर्ण सभा अत्रे रंगमंदिर, कल्याण (पश्चिम) येथे उत्साहात पार पडली.
शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी भारत बोरनारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांच्या नियोजनातून आयोजित करण्यात आलेल्या या सभेत नवीन शैक्षणिक वर्षाचे नियोजन, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, प्रशासकीय कामकाज आणि विद्यार्थी सुरक्षिततेसंदर्भातील विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
सभेत विद्यार्थी सुरक्षा या विषयाला विशेष प्राधान्य देत 13 मे 2025 च्या शासन निर्णयाचे वाचन करण्यात आले. तसेच शाळा स्तरावर आवश्यक उपाययोजनांची प्रभ
Kalyan, Thane | Jun 27, 2026