भोकरदन: गोद्री येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते अनावरण
आज दिनांक एक ऑगस्ट 2025 वार शुक्रवार रोजी दुपारी 4वाजता भोकरदन तालुक्यातील गोदरी या गावांमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते करण्यात आले आहे,याप्रसंगी जयंती उत्सव समितीच्या वतीने त्यांचा शास्त्रीय देऊन सत्कार करण्यात आला आहे,यावेळी त्यांनी उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन केले,याप्रसंगी सरपंच पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.