भोकरदन: भोकरदन काँग्रेस संपर्क कार्यालयावर पार पडली काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक
आज दिनांक 29 जुलै 2025 वार मंगळवार रोजी दुपारी 12 वाजता भोकरदन येथील काँग्रेसच्या संपर्क कार्यालयावर भोकरदन जाफराबाद तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची वा अधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतच्या निवडणुकी संदर्भात योग्य त्या सूचना देण्यासाठी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष त्र्यंबक आप्पा पाबळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक आज पार पडली असून याप्रसंगी जिल्हाध्यक्ष व काँग्रेसचे पदाधिकारी हे सुद्धा उपस्थित झाले होते.