भोकरदन: खादगाव येथे गायराणात विविध मागण्यांसाठी शिवरुद्रयोगी महाराज यांचे समाधी आंदोलन सुरू
आज दिनांक 31 जुलै 2025 वार गुरुवार रोजी दुपारी 2 वाजता भोकरदन तालुक्यातील खादगाव येथे गायरान गट क्रमांक 57 मध्ये विविध मागण्यांसाठी शिवरुद्र योगी महाराज यांनी समाधी आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये त्यांनी मागणी केली आहे की गायरान गट क्रमांक 57 मध्ये कित्येक जणांनी अतिक्रमण केले असून ते तात्काळ काढावे आणि जोपर्यंत प्रशासन हे झालेले अनधिकृतपणे अतिक्रमण काढत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा इशारा या प्रसंगी त्यांनी प्रशासनाला दिला आहे.