अक्कलकुवा: एकनाथ शिंदे यांनी माझी लाडकी बहीण योजना आणली परंतु योजनेमुळे आम्हाला दुःख : आमदार आमशा पाडवी
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी लाडकी बहीण योजना आणली. ही चांगली गोष्ट आहे परंतु या योजनेमुळे आम्हाला दुःख असल्याची खंत नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा धडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे. आदिवासींचा निधी या योजनेसाठी वर्ग करीत असल्यामुळे हे दुःख असल्याचं त्यांनी सांगितले.