अक्कलकुवा: शाळा प्रवेशोत्सव 2025-26 कार्यक्रमांतर्गत आमदार आमश्या पाडवी यांच्या उपस्थितीत ब्रिटिश अंकुशविहिर येथे कार्यक्रम संपन्न
शाळा प्रवेशोत्सव 2025 - 26 या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद केंद्र शाळा ब्रिटिशांकुश विहीर येथे आमदार आमश्या पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली दि.16 जून रोजी सकाळी विद्यार्थ्यांच्या प्रथम दिवस प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार दिलीप गांगुर्डे ,गटविकास अधिकारी लालू पावरा, गटशिक्षणाधिकारी प्रशांत नरवाडे आदी मान्यवर उपस्थित होते.