अक्कलकुवा: आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ,अक्कलकुवा आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची चक्क मालट्रक मधून वाहतूक #वायरल व्हिडिओ
नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील अक्कलकुवा तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्याच्या जीवाशी शिक्षण संस्था जणू खेळ करताना दिसून येत आहेत. अक्कलकुवा येथून जळगाव जिल्ह्यातील देवळी येथे अनुदानित आश्रम शाळेत या ७० विद्यार्थ्यांना चक्क मालट्रक मध्ये कोंबून घेऊन जाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. सदर शिक्षकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील या सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.