अक्कलकुवा: होराफळी घाटात बोलेरो पिकअप वाहन पलटी होऊन भीषण अपघात; २२ प्रवासी गंभीर जख्मी
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील होराफळी घाटात बोलेरो पिकअप वाहन आज दुपारी पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात वाहनातील २२ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना 108 रुग्णवाहिकेच्या माध्यमातून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.