अक्कलकुवा: कृषी विभागाची मोठी कारवाई खापर गावाजवळ ६ लाखांचे बोगस बियाणे केले जप्त
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील महाराष्ट्र गुजरात सीमेवरती भागात खापर गावाजवळ नंदुरबार कृषी विभागाने मोठी कारवाई केली आहे. सुमारे सहा लाखांचे बोगस कापसाचे एचटीबीटी बियाणे खाजगी वाहनातून जप्त केले असून याप्रकरणी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.