अक्कलकुवा: अक्कलकुवा तालुक्यातील डाब परिसरातील पाटिल पाडा आदि गावात विद्युत रोहित्र दुरुस्ती करा; भाजपचे नागेश पाडवी यांची मागणी
अक्कलकुवा तालुक्यातील येथील पाटीलपाडा, खाणीगव्हाणपाडा, जांभीपाणी पाडा येथील विद्युत रोहित्र नादुरुस्त झाल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तरी सदरील विद्युत रोहित्र दुरुस्त करण्यात यावे. असे आश्याचे निवेदन भाजपचे अक्कलकुवा विधानसभा प्रमुख नागेश पाडवी यांनी उपकार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनी अक्कलकुवा यांना दिले आहे.