रत्नागिरी पोलीस दलाच्या दैनंदिन कामकाजात तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी व परिणामकारक वापर करून पोलीस यंत्रणेची कार्यक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने नवीन C.C.T.N.S. Training Centre ची स्थापना करण्यात आली आहे. या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र श्री. चंद्र किशोर मीणा (भा.पो.से.) यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) , मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्यासह रत्नागिरी पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
तसेच मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. चंद्र किशोर मीणा (भा.पो.से.) यांनी Ratnagiri Police Health Club ची पाहणी करून तेथील उपलब्ध सुविधांची माहिती घेतली.
CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #cctns #trainingcenter #ratnagiripolice