“मिशन फिनिक्स” अंतर्गत रत्नागिरी पोलीस दलातर्फे ‘ड्रग्स फ्री रत्नागिरी’साठी रेन रनचे आयोजन
“मिशन फिनिक्स” अंतर्गत रत्नागिरी पोलीस दल व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ड्रग्स फ्री रत्नागिरी’ या जनजागृती अभियानासाठी ‘रेन रन’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमास मा. पालकमंत्री डॉ. उदय सामंत तसेच मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी उपस्थित नागरिक व सहभागी धावपटूंना अंमली पदार्थमुक्त रत्नागिरीचा संकल्प करण्याचे आवाहन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रेन रन मॅरेथॉनला सुरुवात करण्यात आली.
"मिशन फिनिक्स"अंतर्गत आयोजित या उपक्रमातून अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करत निरोगी, सुरक्षित व नशामुक्त समाजाचा संदेश देण्यात आला.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range #rainrun #saynotodrugs #awareness #ratnagiri
61 views | Ratnagiri, Maharashtra | Aug 30, 2026