जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे मा.पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सायबर गुन्हे आढावा बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी मा. जिल्हाधिकारी श्री. मनुज जिंदाल, मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील सायबर फसवणुकीसंदर्भातील गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आला. तसेच सायबर फसवणूक रोखण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामार्फत “मिशन रायझिंग फ्लॉवर्स” व “मिशन सायबर जागृती” अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांनी दिली.
सदर बैठकीस रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range #cyber #crime #awareness #ratnagiripolice
16 views | Ratnagiri, Maharashtra | Aug 27, 2026