दोन दिवसांत दुष्काळ जाहीर करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही; खरोसा येथे शेतकऱ्यांना दिलासा
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज औसा तालुक्यातील खरोसा शिवारात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, १९७२ नंतरचा हा सर्वात मोठा दुष्काळ आहे. राज्यातील परिस्थिती गंभीर असून येत्या दोन दिवसांत राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात येईल. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
तसेच दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येतील आणि स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीच्या कामांना गती दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी भाजप पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी व मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.
Latur, Latur | Sep 23, 2026