गडचिरोली पोलीसांची अवैध दारू तस्करीविरोधात मोठी कारवाई.
स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली पोलीस व आष्टी पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत दोन वेगवेगळ्या ठिकाणी अवैध देशी-विदेशी दारूची वाहतूक उधळून लावण्यात आली.
या कारवाईत 02 चारचाकी वाहनांसह अवैध दारूचा एकूण ₹22,99,400 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अवैध दारू विक्री, साठवणूक व वाहतुकीविरुद्ध अशी कठोर कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहणार आहे.
गडचिरोली पोलीस दल
नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर.
#GadchiroliPolice #IllegalLiquor #CrimeControl #LawEnforcement #MaharashtraPolice PublicSafety ZeroTolerance Gadchiroli CitizenSafety ActionAgainstCrime
29 views | Gadchiroli, Maharashtra | Aug 2, 2026