Public App Logo
अवैध दारू व्यवसायाविरोधात धानोरा पोलिसांची कठोर कारवाई! पोलीस स्टेशन धानोरा पथकाने मौजा वानरचुवा जंगल परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत अवैध हातभट्टी दारू निर्मिती व साठवणुकीवर कारवाई केली. कारवाईदरम्यान मोहफुलाचा सडवा, हातभट्टी दारू व दारू निर्मितीचे साहित्य असा एकूण ₹3,44,000/- किमतीचा मुद्देमाल घटनास्थळी नियमानुसार नष्ट करण्यात आला. दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधित आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन धानोरा येथे गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे. पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील अवैध दारू निर्मिती, साठवणूक व विक्रीविरोधात गडचिरोली पोलीस दलाची कारवाई यापुढेही कठोरपणे सुरू राहणार आहे. अवैध व्यवसायाला आळा… कायद्याची कठोर अंमलबजावणी! #GadchiroliPolice #DhanoraPolice #IllegalLiquorAction #CrimePrevention #MaharashtraPolice @mramesh_ips @dgpmaharashtra - Gadchiroli News