अवैध दारू व्यवसायाविरोधात गडचिरोली पोलिसांची कठोर कारवाई!
पोलीस मदत केंद्र येलचील हद्दीतील मौजा नवेगाव व मौजा वेलगुर टोला शेतशिवारात पोलीस पथकाने चार वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकून अवैध मोहफुलाच्या हातभट्टी दारू व्यवसायावर कारवाई केली.
या कारवाईत अवैध हातभट्ट्या नष्ट करून एकूण ₹5,40,000/- किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला असून, अवैध दारू निर्मिती, साठवणूक व विक्री करणाऱ्या 04 आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील अवैध दारू व्यवसायाविरोधात गडचिरोली पोलीस दलाची कठोर कारवाई सातत्याने सुरू आहे.
अवैध व्यवसायाला आळा… कायद्याची कठोर अंमलबजावणी!
#GadchiroliPolice #IllegalLiquorAction #CrimePrevention #Yelchil #maharashtrapolice @mramesh_ips @dgpmaharashtra
7 views | Gadchiroli, Maharashtra | Aug 22, 2026