Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
image
image
image

दुर्गम भागातील नागरिकांच्या आरोग्यासाठी गडचिरोली पोलीस दलाचा पुढाकार! मौजा गॅरापत्ती येथील आठवडी बाजारादरम्यान मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. पोलीस रुग्णालय गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली व जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. शिबिरात तज्ज्ञ वैद्यकीय पथकाकडून 84 नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार मोफत औषधे देण्यात आली. तसेच विविध आजार व पोषणविषयक समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी फिरत्या प्रदर्शनीच्या माध्यमातून शहीद जवानांचे बलिदान, सी-60 जवानांचे शौर्य आणि गडचिरोली पोलीस दलाच्या नागरी कृती उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली. सन 2021 पासून 206 आरोग्य मेळाव्यांच्या माध्यमातून 43 हजारांहून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून, ‘ऑपरेशन रोशनी’ अंतर्गत 9,971 हून अधिक नागरिकांची नेत्र तपासणी व 1,412 नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सुरक्षेसोबतच आरोग्याचीही साथ… नागरिकांच्या सेवेसाठी गडचिरोली पोलीस सदैव तत्पर! #GadchiroliPolice #HealthCamp #CivicAction #HealthyGadchiroli #MaharashtraPolice

1 views | Gadchiroli, Maharashtra | Aug 17, 2026

MORE NEWS

अवैध दारू व्यवसायाविरोधात धानोरा पोलिसांची कठोर कारवाई!

पोलीस स्टेशन धानोरा पथकाने मौजा वानरचुवा जंगल परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत अवैध हातभट्टी दारू निर्मिती व साठवणुकीवर कारवाई केली.

कारवाईदरम्यान मोहफुलाचा सडवा, हातभट्टी दारू व दारू निर्मितीचे साहित्य असा एकूण ₹3,44,000/- किमतीचा मुद्देमाल घटनास्थळी नियमानुसार नष्ट करण्यात आला.

दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधित आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन धानोरा येथे गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे.

पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील अवैध दारू निर्मिती, साठवणूक व विक्रीविरोधात गडचिरोली पोलीस दलाची कारवाई यापुढेही कठोरपणे सुरू राहणार आहे.

अवैध व्यवसायाला आळा… कायद्याची कठोर अंमलबजावणी!

#GadchiroliPolice #DhanoraPolice #IllegalLiquorAction #CrimePrevention #MaharashtraPolice

@mramesh_ips @dgpmaharashtra

अवैध दारू व्यवसायाविरोधात धानोरा पोलिसांची कठोर कारवाई! पोलीस स्टेशन धानोरा पथकाने मौजा वानरचुवा जंगल परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत अवैध हातभट्टी दारू निर्मिती व साठवणुकीवर कारवाई केली. कारवाईदरम्यान मोहफुलाचा सडवा, हातभट्टी दारू व दारू निर्मितीचे साहित्य असा एकूण ₹3,44,000/- किमतीचा मुद्देमाल घटनास्थळी नियमानुसार नष्ट करण्यात आला. दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधित आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन धानोरा येथे गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे. पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील अवैध दारू निर्मिती, साठवणूक व विक्रीविरोधात गडचिरोली पोलीस दलाची कारवाई यापुढेही कठोरपणे सुरू राहणार आहे. अवैध व्यवसायाला आळा… कायद्याची कठोर अंमलबजावणी! #GadchiroliPolice #DhanoraPolice #IllegalLiquorAction #CrimePrevention #MaharashtraPolice @mramesh_ips @dgpmaharashtra

Gadchiroli, Maharashtra | Aug 17, 2026

गडचिरोली पोलीस दलातर्फे 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा!

पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या हस्ते ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी राष्ट्रपतींचे पोलीस शौर्य पदक व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर झालेल्या अधिकारी व अंमलदारांचा सन्मान करण्यात आला. तसेच वेगवर्धित पदोन्नती मिळालेले अधिकारी व अंमलदार, उत्कृष्ट व अतिउत्कृष्ट सेवा पदकप्राप्त अधिकारी व अंमलदार यांना शुभेच्छा देण्यात आल्या. 05 पोलीस अधिकारी व अंमलदारांना प्रातिनिधिक स्वरूपात सी-60 सेवा पदक प्रदान करण्यात आले.

पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी शहीद कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व उपस्थित सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

गडचिरोलीत स्वातंत्र्याचा उत्सव! 

#GadchiroliPolice #IndependenceDay2026 #स्वातंत्र्यदिन #MaharashtraPolice #JaiHind

गडचिरोली पोलीस दलातर्फे 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा! पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या हस्ते ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रपतींचे पोलीस शौर्य पदक व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर झालेल्या अधिकारी व अंमलदारांचा सन्मान करण्यात आला. तसेच वेगवर्धित पदोन्नती मिळालेले अधिकारी व अंमलदार, उत्कृष्ट व अतिउत्कृष्ट सेवा पदकप्राप्त अधिकारी व अंमलदार यांना शुभेच्छा देण्यात आल्या. 05 पोलीस अधिकारी व अंमलदारांना प्रातिनिधिक स्वरूपात सी-60 सेवा पदक प्रदान करण्यात आले. पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी शहीद कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व उपस्थित सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. गडचिरोलीत स्वातंत्र्याचा उत्सव! #GadchiroliPolice #IndependenceDay2026 #स्वातंत्र्यदिन #MaharashtraPolice #JaiHind

Gadchiroli, Maharashtra | Aug 15, 2026

स्वातंत्र्यानंतर प्रथमच पोमके बिनागुंडा येथे फडकला तिरंगा! 

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पोलीस मदत केंद्र बिनागुंडा येथे स्वातंत्र्यानंतर प्रथमच नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागासह राष्ट्रध्वज फडकविण्यात आला.

पडत्या पावसाचीही पर्वा न करता स्थानिक नागरिक व पोलीस दलाने मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा केला. दुर्गम भागात फडकणारा तिरंगा हा शांतता, विश्वास आणि बदलत्या गडचिरोलीचे प्रतीक ठरला.

पाऊस बरसत राहिला… तिरंगा अभिमानाने फडकत राहिला! 

#GadchiroliPolice #IndependenceDay2026 #Binagunda #HarGharTiranga #MaharashtraPolice

स्वातंत्र्यानंतर प्रथमच पोमके बिनागुंडा येथे फडकला तिरंगा! स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पोलीस मदत केंद्र बिनागुंडा येथे स्वातंत्र्यानंतर प्रथमच नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागासह राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. पडत्या पावसाचीही पर्वा न करता स्थानिक नागरिक व पोलीस दलाने मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा केला. दुर्गम भागात फडकणारा तिरंगा हा शांतता, विश्वास आणि बदलत्या गडचिरोलीचे प्रतीक ठरला. पाऊस बरसत राहिला… तिरंगा अभिमानाने फडकत राहिला! #GadchiroliPolice #IndependenceDay2026 #Binagunda #HarGharTiranga #MaharashtraPolice

Gadchiroli, Maharashtra | Aug 15, 2026

हर घर तिरंगा… देशभक्तीचा जल्लोष, एकतेचा नवा संकल्प! 

गडचिरोली येथे मा. राज्यमंत्री तथा सह-पालकमंत्री श्री. आशिष जयस्वाल यांच्या शुभहस्ते हिरवा झेंडा दाखवून भव्य तिरंगा बाईक रॅलीचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला.

या रॅलीत मा. सह-पालकमंत्री, मा. आमदार, पोलीस अधीक्षक तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. 300 हून अधिक पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या उत्स्फूर्त सहभागातून संपूर्ण शहरात राष्ट्रप्रेम, एकता आणि तिरंग्याच्या सन्मानाचा संदेश देण्यात आला.

हाती तिरंगा… मनात राष्ट्राभिमान!
एकतेच्या रंगात रंगले गडचिरोली! 

#GadchiroliPolice #HarGharTiranga #TirangaBikeRally #IndependenceDay2026 #MaharashtraPolice

@mramesh_ips @adv._ashish_jaiswal @dgpmaharashtra

हर घर तिरंगा… देशभक्तीचा जल्लोष, एकतेचा नवा संकल्प! गडचिरोली येथे मा. राज्यमंत्री तथा सह-पालकमंत्री श्री. आशिष जयस्वाल यांच्या शुभहस्ते हिरवा झेंडा दाखवून भव्य तिरंगा बाईक रॅलीचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. या रॅलीत मा. सह-पालकमंत्री, मा. आमदार, पोलीस अधीक्षक तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. 300 हून अधिक पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या उत्स्फूर्त सहभागातून संपूर्ण शहरात राष्ट्रप्रेम, एकता आणि तिरंग्याच्या सन्मानाचा संदेश देण्यात आला. हाती तिरंगा… मनात राष्ट्राभिमान! एकतेच्या रंगात रंगले गडचिरोली! #GadchiroliPolice #HarGharTiranga #TirangaBikeRally #IndependenceDay2026 #MaharashtraPolice @mramesh_ips @adv._ashish_jaiswal @dgpmaharashtra

Gadchiroli, Maharashtra | Aug 15, 2026