दारूच्या नशेत बुलेटस्वार दाम्पत्याचा रस्त्यावर धिंगाणा; 'मी पोलीस आहे' म्हणत चालकाला शिवीगाळ, नागरिकांकडून चोप....
.
.
रस्त्यावर हुल्लडबाजी करणाऱ्या आणि कायद्याचा धाक दाखवणाऱ्या दारुड्यांना नागरिकांनी चांगलाच धडा शिकवला आहे. दारूच्या नशेत चक्क बुलेटवरून आलेल्या एका दाम्पत्याने रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनचालकांशी वाद घालत मोठा धिंगाणा घातला. एवढेच नव्हे तर, "मी पोलीस आहे," अशी खोटी धमकी देत समोरच्या चालकाला अद्वातद्वा शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांचा हा तोरा फार काळ टिकला नाही आणि संतप्त नागरिकांनी त्यांना भररस्त्यात चोप दिला.
.
.
.
#BulletRider #DrunkAndDrive #RoadRage #ViralVideo #MaharashtraNews #CrimeUpdates #PublicAnger #SocialAwareness #CivicSense #LawAndOrder #TrendingMarathi #PoliceFake #RoadSafety #CrimeNewsMarathi
Haveli, Pune | Jun 28, 2026