"शाळेच्या बसमधून उतरल्या उतरल्या अपघात ; बीडमध्ये दुसरीतील चिमुरडीला दुचाकीची जोरदार धडक, अपघाताने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.."
.
.
बीडमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना; स्कूल बसमधून उतरलेल्या दुसरीतील चिमुकलीला भरधाव दुचाकीने उडवले, अवस्था गंभीर! स्कूल बसमधून सुखरूप उतरून घराकडे जाणाऱ्या एका निष्पाप चिमुकलीला बेदरकार दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना बीड शहरातील गया नगर भागात घडली आहे. या अंगावर काटा आणणाऱ्या भीषण अपघाताचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून ते पाहून कोणाचेही काळीज हेलावून जाईल.
जखमी चिमुकली ही बीडमधील 'गुरुकुल पब्लिक स्कूल'मध्ये दुसऱ्या इयत्तेत शिकते. नेहमीप्रमाणे स्कूल बस तिला सोडण्यासाठी गया नगर भागात आली होती. बसमधून उतरून ती रस्त्यावरून बाजूला जात असतानाच, समोरून अत्यंत बेजबाबदारपणे आणि भरधाव वेगाने येणाऱ्या एका दुचाकीस्वाराने तिला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की ती चिमुकली रस्त्यावर दूर जाऊन पडली.या अपघातात ही चिमुकली गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. चिमुकलीच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण परिसरातून या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
.
.
.
#BeedAccident #RoadSafety #BeedNews #CCTVFootage #SchoolBusSafety #AccidentUpdate #RashDriving #BeedCity #MaharashtraNews #SaveOurChildren #SocialAwareness #BreakingNewsMarathi #CarelessDriving #AlertCitizen #SafetyFirst
Haveli, Pune | Jun 28, 2026