अक्कलकुवा: अक्कलकुवा शहरातील मक्राणीफळी येथे गुडघाभर पाणी; नागरिक त्रस्त
अक्कलकुवा शहरा लगत असलेले मक्राणीफळी येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण भागात नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते अनेक नागरिकांचा घरात तसेच शाळेत देखील पाणी शिरले यामुळे नागरिका बेहाल झाले आहे. नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील झाले आहे. परिसरातील सर्व गटारी हे तुंबलेल्या असल्याने पाण्याला जाण्यासाठी कुठलाही मार्ग नसल्याने नागरिकांचे हाल होत आहे.