अक्कलकुवा: बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर कवली गावासमोर रास्ता रोको करणाऱ्या ३० ते ४० जणांवर अक्कलकुवा पोलिसांत गुन्हा दाखल
नंदुरबार जिल्ह्यातील बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर अक्कलकुवा तालुक्यातील कवली गावासमोर वाहनाने कट मारला या कारणावरून ३० ते ४० अनोळखी व्यक्तींनी २२ जून रोजी रात्री नऊ ते साडेअकरा वाजेच्या दरम्यान रास्ता रोको केला होता. याप्रकरणी २३ जून रोजी दुपारी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई अनिल वसावे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.