अक्कलकुवा: अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर वाण्याविहीर गावाजवळील वरखेडी नदीवरील पूल पाण्याखाली वाहतूक ठप्प
अक्कलकुवा तालुक्यात आज सकाळपासूनच मुसळधार पावसाने आपली हजेरी लावली आहे. तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावरील वाण्याविहीर गावाजवळ असलेल्या वरखेडी नदीला पूर आल्याने पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे.