अक्कलकुवा: मुसळधार पावसामुळे अक्कलकुवा शहरातील अनेक रस्त्यांना नदीचे स्वरूप
अक्कलकुवा शहरात रात्रि जोरदार पाऊस झाला आहे. सतत सुरु असलेल्या पावसामुळे अक्कलकुवा शहरातील अनेक भागत रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सदर दिनांक 25 जून 2025 रोजी सकाळी अनेक भागातील रस्त्यांना नदीचे स्वरूप पाहायला मिळाले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांना दैनंदिन कामासाठी तसेच विद्यार्थ्यांना, वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.