मुरुड: सुपेगाव रस्त्यावर झाडाझुडपांचा विळखा
Murud, Raigad | Jun 27, 2026 मुरुड-सुपेगाव-रोहा मार्गावरील सुपेगाव परिसरात रस्त्यालगतची झाडे आणि झुकलेल्या फांद्या वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहेत. रस्त्यावर खाली आलेल्या फांद्या तसेच वाढलेल्या झुडपांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाबद्दल वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.