आज शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मुरुड येथील ग्रामपंचायत विहूर अंतर्गत ताडदेव-मोरे रस्त्यावरील साकवाचे लोकार्पण केले. तत्पूर्वी देवी मातेच्या चरणी लीन होत मनोभावे दर्शन घेतले. या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने संबोधित करताना, राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले आहे. ताडदेव-मोरे रस्त्यावरील साकवाप्रमाणे यापुढील काळात ग्रामीण भागातील इतर पायाभूत सोयीसुविधांना गती देण्याच्या दृष्टीने काम करत राहण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच विहूर येथील देवी मातेच्या मंदिरास धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने येत्या वर्षभरात तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला जाईल, असा शब्द नागरिकांना दिला. याप्रसंगी राष्ट्रवादीचे पदाधिकारी, विहूर ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामस्थ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.