तिरंगा रॅली नंतर खासदार श्रीकांत शिंदे यांचा संवेदनशील पुढाकार
रॅलीत सहभागी झालेल्या काही विद्यार्थी आणि शिक्षकांना आपल्या ताफ्यातील वाहनांमधून केलं रवाना
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या भव्य तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रॅली संपल्यानंतर सहभागी झालेल्या काही शिक्षक आणि विद्यार्थ्यांना घरी परतण्यासाठी वाहनांची अडचण निर्माण झाली.
यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेत आपल्या ताफ्यातील वाहनांमध्ये शिक्षक आणि मुलांना बसवून त्यांना मार्गस्थ केले. स्वतःच्या ताफ्यातील गाड्या उपलब्ध करून देत त्यांनी या विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा प्रवास सुखकर केला.
रॅलीतील भव्य आयोजनानंतर समोर आलेल्या या छोट्याशा पण संवेदनशील कृतीमुळे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माणुसकीचे दर्शन घडले. सार्वजनिक जीवनात पद आणि प्रतिष्ठेपेक्षा माणुसकीला महत्त्व देणारा हा प्रसंग उपस्थिता�
Kalyan, Thane | Aug 15, 2026