नरखेड: आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या हस्ते सावरगाव येथील विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी; कामांच्या प्रगतीचा घेतला आढावा
Narkhed, Nagpur | Aug 16, 2026 आज आमदार चरणसिंग ठाकूर यांनी सावरगाव येथे सुरू असलेल्या विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून कामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी सुरू असलेल्या कामांची गुणवत्ता तपासली तसेच गावाच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विविध बाबींची सविस्तर माहिती घेतली व संबंधित अधिकाऱ्यांशी व ठेकेदारांशी चर्चा केली. गावातील विकासकामे दर्जेदार व वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी त्यांनी यंत्रणेला आवश्यक त्या सूचना दिल्या