जळगाव लाईव्ह न्यूज । पाळधी गावाजवळील महामार्गावर भरधाव कंटेनरचा अचानक ताबा सुटल्याने तो रस्त्यावर पलटी झाला. याचवेळी कंटेनरखाली दोनगाव बुद्रुक येथील दुचाकीस्वार तरुण दबला गेल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून या अपघातात दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला आहे.
#jalgaon #jalgaonlive #jalgaonlivenews #accident