दर्यापूर: दर्यापूरमधील जुगार अड्ड्यावर अमरावती ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, 13 जणांना अटक
दर्यापूर राजपूतपुरा परिसरातील जुगार अड्ड्यावर अमरावती ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून 13 जणांना ताब्यात घेतलं. 9.33 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त झाला असून गुन्हा दर्यापूर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे.