दर्यापूर तालुक्यातील शिवरडे जाणाऱ्या रोड परिसरात शेतीच्या रस्त्यावरून रेतीचा ट्रॅक्टर नेण्याच्या कारणावरून व जुन्या वादातून एका युवकावर चौघांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना दिनांक ३ डिसेंबर रोजी १ वाजता घडली आहे. या प्रकरणी दर्यापूर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे व दोन आरोपींना अटक करण्यात आली.