अकोट रोडवरील गांधी पेट्रोल पंपाजवळ आज दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास स्कूल व्हॅन आणि दुचाकी यांच्यात जोरदार धडक होऊन दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात जखमी दुचाकी चालकास तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, एमएच २७ एक्स ९७६४ क्रमांकाची स्कूल व्हॅन विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना,समोरून येणाऱ्या एमएच २७ डीपी ६८६७ क्रमांकाच्या दुचाकीने व्हॅनला धडक. या धडकेत दुचाकीवरील युवक गंभीर जखमी झाला.