दर्यापूर नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या वतीने बहुमत मिळवत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. मंदाकिनी सुधाकरराव भारसाकळे या विजयी झाल्या. त्यानंतर आज दर्यापूर नगर परिषद प्रांगणात त्यांचा औपचारिक व उत्साहपूर्ण पदग्रहण सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला.या सोहळ्यास अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे,दर्यापूर–अंजनगाव मतदार संघाचे आमदार गजानन लवटे माझी पालकमंत्री व राज्यमंत्री यशोमती ताई ठाकूर चांदूर रेल्वे मतदार संघाचे मा.आ.विरेंद्र जगताप यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.