रहिमापूर पोलीस स्टेशन हद्दीतील कापूसतळणी येथे अज्ञात चोरट्यांनी उभ्या दोन ट्रॅक्टरमधील जुन्या वापरातील बॅटऱ्या चोरून नेल्याची घटना दि.२ जाने.मध्यरात्री १ ते आज सकाळी ६ वा.च्या सुमारास उघडकीस आली आहे.या प्रकरणी रहिमापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.फिर्यादी अजहर खान वय ३२ वर्षे,रा. सलीमनगर,नारायणपूर)यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार दि २ जाने रात्री १ ते सकाळी ६ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ट्रॅक्टरमधील बॅटरी चोरुन नेली.